![]()
उपराजधानी नागपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात एका 8 वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या 60 वर्षीय वृद्धाने शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार स
.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी परिसरात असताना शेजारी राहणाऱ्या 60 वर्षीय आरोपीने तिला बोलावून घेतले आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या प्रकाराबाबत कोणालाही वाच्यता केल्यास हात-पाय तोडण्याची गंभीर धमकीही आरोपीने तिला दिली होती. मात्र, घाबरलेल्या अवस्थेत पीडितेने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला.
यापूर्वीही अनेकदा अत्याचार केल्याचे उघड
पीडितेच्या आईने या प्रकाराची खात्री केल्यानंतर कुटुंबीयांसह नंदनवन पोलिस ठाणे गाठत घटनेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास केला असता, आरोपीने यापूर्वीही पीडित चिमुरडीवर अनेकदा अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपीला अटक
या तक्रारीच्या आधारे नंदनवन पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत वृद्ध आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.