सध्या देशातील राजकारण डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावरून चांगलेच धलवून निघाले आहे. महाराष्ट्रात देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्याचे समोर आल्याने इंडिया आघाडीत तसेच महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. शरद पवार सध्या ब्रीच कॅन
.
पार्थ पवार यांनी जे स्टेटस ठेवले आहे, त्यात असे लिहिले आहे की, “तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या, साप हा सापच असतो.” असे स्टेटस असलेला एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक माणूस सापाला पाणी पाजत असतो आणि पाणी प्यायल्यानंतर साप त्याच व्यक्तीला डसतो. आता डसणारा साप नेमके कोणाला उद्देशून म्हटले आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशनच्या संदर्भात सकारात्मक भूमिका मंडल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये सामील होणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली होती. असे असले तरी दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये कुठलेही समन्वय दिसून येत नाहीये. त्यात पार्थ पवारांच्या स्टेटसने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
पार्थ पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ पहा
ही देखील बातमी वाचा..
मनात प्रचंड अस्वस्थता आणि वेदना…:साहेब आजारी असताना डिलिमिटेशनला पाठिंबा नको, रोहित पवारांचे सुप्रिया सुळेंना भावनिक पत्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना भावनिक पत्र लिहिले असून, त्यातून डिलिमिटेशनवरील भूमिकेबाबत आपले रोखठोक मत मांडले आहे. या पत्रात रोहित पवार यांनी म्हटले आहे की, “आज हे पत्र लिहिताना मनात प्रचंड अस्वस्थता आणि वेदना आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत. साहेबांच्या या अवस्थेनं आपल्या सर्वांच्याच मनात काहूर माजलंय, पण ते लवकरच ठणठणीत बरे होतील, असा विश्वास देखील आहे. पण अशा कठीण प्रसंगी, सध्या ‘डिलिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत सुरु असलेल्या चर्चामुळं राज्यातील पुरोगामी विचारांना मानणाऱ्या जनतेला मोठा धक्का बसलाय,” असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. वाचा सविस्तर