Headlines

वाळूजमधील कारखान्याला आग; 50 कामगार बचावले:अडीच तासांनंतर आगीवर नियंत्रण




वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री वरद इंडस्ट्रीज या कारखान्याला २९ एप्रिलच्या रात्री भीषण आग लागली. सुदैवाने आगीच्या वेळी ड्यूटीवर असलेल्या ५० कामगारांनी प्रसंगावधान राखून सुरक्षित स्थळी धाव घेतल्याने जीवितहानी टळली. मात्र, या दुर्घटनेत कारखान्याचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. गट क्रमांक १२६ मधील प्लॉट क्रमांक ८ वर असलेली ही कंपनी दुचाकींचे सुटे भाग बनवते. रात्री अचानक स्फोटासारखा मोठा आवाज झाला आणि काही क्षणांतच आगीचा भडका उडाला. आग इतकी भीषण होती की एमआयडीसीच्या दोन अग्निशमन बंबांना आग विझविण्यासाठी अडीच तासांहून अधिक काळ (सुमारे २ तास ३८ मिनिटे) शर्थीचे प्रयत्न करावे लागले. रात्री ११.०९ वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आली. उपअग्निशमन अधिकारी अनिल एस. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील १२ जवानांच्या पथकाने ही मोहीम फत्ते केली. याबाबत कंपनीचे पराग देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बोलणे टाळले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *