Headlines

हिंगोलीत अवैध सावकारीवर धडक कारवाई:11 खरेदीखत, 9 कोरे बाँड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त




औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोळी निळोबा येथे जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांच्या पथकाने गुरुवारी ता. ९ सकाळी सात वाजता अवैध सावकारीच्या संशयावरून एका घरावर छापा टाकला. यामध्ये ११ खरेदीखत, ९ कोरे बॉण्ड, पाच चिठ्ठा, सात कॅलेंडर व इतर साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा येथील सुंदरराव मोरे यांच्या विरुध्द अवैध सावकारीची तक्रार प्राप्त झाली होती. यामध्ये तक्रारदाराने काही रक्कम घेऊन त्यांची जमीन मोरे यांच्या नावे करून दिली होती. सदर जमीन तक्रारदारच वहिती करीत होता. मात्र लिहून दिलेली जमीन परत केली जात नसल्याने तक्रारदाराने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे, सहकार अधिकारी बी. डी. पठाडे, ए. ए. वानखेडे, एस. जी. आंधळे, के. जी. घालेवाड, जमादार रोहिदास राठोड, महिला पोलिस कर्मचारी साधना शेळके यांच्या पथकाने आज सकाळी सात वाजता चिंचोली निळोबा येथे सुंदरराव मोरे यांच्या घरावर छापा टाकला. यामध्ये घरातील पेटी व इतर साहित्याची तपासणी केली असता त्यात जमीनीचे ११ खरेदी खत केल्याचे दिसून आले. तसेच तीन बॉण्डवर जागेचे खरेदीखत झालेले आढळून आले तर ९ कोरे बॉण्ड, पैशाचे व्यवहार केलेल्या पाच चिठ्ठ्या, तसेच पैशाचे व्यवहार नमुद केलेल्या तारखेचे सन २०१७ पासूनच्या सात दिनदर्शिका सापडल्या. सदर सर्व साहित्य पथकाने पंचनामा करून जप्त करून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आणण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या या कारवाईमुळे जिल्हयात अवैध सावकारी करणाऱ्या तथाकथीत सावकारांचे धाबे दणाणले आहे. मंगळवारी कागदपत्रांची होणार तपासणीः सुरेखा फुपाटे, जिल्हा उपनिबंधक या प्रकरणात आता जप्त केलेल्या कागदपत्रांची मंगळवारी ता. १४ तपासणी केली जाईल. त्यानंतर कलम १५ नुसार सुनावणी घेऊन खरेदीखत नोंदविलेल्या शेतकऱ्यांचे जवाब नोंदविले जाणार आहेत. त्यानंतच पुढील कारवाई केली जाणार आहे. हेही वाचा.. मराठवाडा हादरला:हिंगोलीसह परभणी-नांदेडमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, मध्यरात्री जमीन हादरल्याने नागरिकांची सुरक्षित ठिकाणी धाव मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले असून, यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोली, परभणी आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यांमधील अनेक भागांत मध्यरात्री 1 वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचे हे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. हिंगोलीतील शिरळी परिसरात 4.6 रिश्‍टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपाच्या धक्यांमुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *