![]()
मी भविष्यात पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊन देणार नाही. गरज पडली तर पुढील निवडणुकीत दुसरा मतदारसंघ शोधेन, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण तसेच बारामती मतदारसंघावर ताब्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाबाबत त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावर त्या म्हणाल्या की, गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांची जी नातवंडे आहेत, पवार आडनावाची आहेत, त्यांच्याविरोधात कधीही इलेक्शन लढणार नाही. दरम्यान, नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी स्वागत केले. त्या म्हणाल्या, सुप्रियाताईंचे वक्तव्य अतिशय चांगलं आहे. पवार कुटुंबात आपापसांत लढत होऊ नये, हीच आमची सर्वांची इच्छा आहे. तर रोहित पवार म्हणाले की, सुप्रियांची भूमिका भावनिक, राजकीय असू शकते. सध्या जे महायुतीत आहेत, ते पुढे महायुतीत नसतील तरच पवार विरुद्ध पवार लढत होणार नाही. एकुणात बारामतीत पवार विरुद्ध पवार या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यात मतभेद असल्याचे स्पष्ट झाले.
Source link
भविष्यात मी पवार विरोधात पवार लढत होऊ देणार नाही- सुळे:सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य अतिशय चांगलं- सुनेत्रा पवार