Headlines

आरोग्यशिबिरातून दृष्टीबाधित महिलांना शस्त्रक्रियेद्वारे दिली दृष्टी:श्री संत वासुदेव महाराज जयंती महोत्सवानिमित्त संत हरी बाप्पा सेवा समितीचा उपक्रम‎




प्रतिनिधी |अकोट येथील श्री संत हरिरामबाप्पा सत्संग सेवा समितीच्या वतीने राबवण्यात आलेल्या आरोग्य उपक्रमातून दृष्टीबाधित महिलेच्या जीवनात प्रकाशाचा किरण पेरला गेला आहे. श्री संत वासुदेव महाराज जयंती व सेवा समितीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अमोना दुर्गम आदिवासीबहुल खेड्यात आयोजित आरोग्य शिबिरामध्ये पाच रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती. या पाचही रुग्णांवर मोती बिंदूचे यशस्वी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये दोन्ही डोळ्यांनी पूर्णतः अंध असलेल्या एका महिलेला “नासूर’ शस्त्रक्रियेनंतर पुन्हा दृष्टी प्राप्त झाली आहे. ​श्री संत हरिराम बाप्पा सत्संग सेवा समितीने गत २५ वर्षांपासून विविध सेवा उपक्रम राबवून, विशेषतः दुर्गम भागातील गरजू रुग्णांना आरोग्य सेवा पुरवण्याचा “निष्काम कर्मयोग’ जोपासला आहे. याही वर्षी वासुदेव महाराज जयंतीचे औचित्य साधून अकोला येथील “दमाणी आय हॉस्पिटल’ येथे निवडक रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया पार पडल्या. याकामी हॉस्पिटलचे व्यवस्थापक सभापती शुक्ल यांचे मोलाचे योगदान लाभले.​ ​या सेवा यज्ञात जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक आणि संवेदना ग्रुप, अकोला यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच समाजातील विविध दानशूर व्यक्तींनी उपक्रमाला हातभार लावला. यामध्ये दिलीप अग्रवाल, संतराम पारवाणी, कैलास अग्रवाल, संतोष झुनझुनवाला, दिनकरराव ठाकरे, ​अतुल मालानी, नितुल सेदानी, हरीश टावरी, अविनाश अग्रवाल, डॉ. महल्ले (बोर्डी), मुरलीभाई चावडा, शांतीकुमार चौरसिया, पप्पूभाई शेजपाल, सचिन वर्मा, चंद्रेश शेजपाल, कीर्तीभाई ठाकर आणि विजय नेरकर यांचा समावेश आहे. ​या यशस्वी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत, सेवा समितीचे अध्यक्ष सुरेश शेदाणी, सचिव बाबाभाई शेजपाल यांनी वैद्यकीय चमूचे आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *