![]()
जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. नागरिकांनी दिलेल्या अचूक माहितीवर पुढील १० वर्षांसाठी जिल्ह्याच्या शाळा, दवाखाने, रस्ते, पाणीपुरवठा योजना, रेशन व्यवस्था व इतर विकासकामांचे नियोजन अवलंबून आहे. त्यामुळे नागरिकांना स्वगणना करून अचूक माहिती द्यावी, तसेच प
.
राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ व कार्यक्रमाच्या अनुषंगाने पत्रकार परिषद पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे आदी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमात स्वगणनेचा टप्पा आजपासून १५ मेपर्यंत चालेल. त्यानंतर प्रगणकांमार्फत १६ मे १४ जून या कालावधीत घरोघरी जाऊन माहिती संकलन केली जाणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत सुलभ व डिजिटल करण्यात आली आहे.
ऑनलाईन पद्धतीने स्व-गणनेची प्रक्रियेत सहभाग नोंदवता येणार आहे. यासाठी https://se.census.go v.in या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. यात कुटुंब प्रमुखाचे नाव आणि १० अंकी मोबाईल क्रमांक नोंदवून ओटीपीद्वारे लॉग-इन करावे लागले. यात आपला जिल्हा, पिन कोड आणि गावाचे नाव निवडा. गुगल मॅपवर आपल्या राहण्याचे ठिकाण निश्चित करा. विचारलेल्या ३३ प्रश्नांची उत्तरे पर्यायांमधून निवडा. माहितीची खात्री करून फायनल सबमिशन करा. त्यानंतर आपल्याला ११ अंकी एसई आयडी प्राप्त होईल. हा एसई आयडी जपून ठेवा. जेव्हा प्रगणक तुमच्या घरी येतील, तेव्हा त्यांना हा आयडी दाखवणे आवश्यक आहे. जनगणनेच्या कार्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपरिषद शहरी क्षेत्रात एकूण २ हजार ३३८ घर यादी गट बनवण्यात आले असून एक घरयादी गट हा जवळपास १८०-२०० घरे किंवा ६५०-८०० लोकसंख्येपासून तयार केला जातो. जिल्ह्यात २६१४ प्रगणक तसेच प्रत्येक ६ प्रगणकांसाठी १ याप्रमाणे एकूण ४२६ पर्यवेक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
“आपली नोंद, आपला विकास’ हे आहे ब्रीद जिल्ह्याने नेहमीच शासकीय उपक्रमात पुढाकार घेतला आहे. डिजिटल जनगणनेतही आपला जिल्हा महाराष्ट्रात अव्वल राहील, असा मला विश्वास असल्याचे पालकमंत्री म्हणाले. “आपली नोंद, आपला विकास’ हे ब्रीद लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी स्व-गणना करावी व प्रगणकांना सहकार्य करावे. जनजागृतीसाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असून, या कार्यासाठी माध्यमांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.