Headlines

The working class will be in power by destroying the capitalist system, labor leader Com. Prof. Tanaji Thombre expressed optimism in Barshi.



शिकागो शहरांमध्ये कामगारांच्या नेत्यांनी संघर्ष घडविला रक्ताचे बलिदान दिले. तो इतिहास न विसरता मार्क्सवादी संघर्षाने पुढे जात राहिल्यास भांडवली व्यवस्थेला उद््ध्वस्त करत कामगार वर्ग सत्तेवर असेल, असा आशावाद ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड प्रा. तानाजी ठो

.

जागतिक कामगार दिनानिमित्त शुक्रवारी आयोजित सभेचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना प्रा. ठोंबरे बोलत होते. आयटक कामगार केंद्राच्या वतीने पुतळा पार्क येथून महापुरुषांना अभिवादन करत घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक कढण्यात आली. त्यानंतर सभेची सुरुवात लाल बावटा फडकवून करण्यात आली. या वेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे कॉम्रेड ए. बी. कुलकर्णी, डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघाचे कॉ. लहू आगलावे, सूरज अन्नदाते, अनिरुद्ध नखाते, अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर कर्मचारी संघटनेचे प्रवीण मस्तुद व बार्शी नगरपालीका कंत्राटी कामगार संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी युवराज घाडगे, केदार फुले, बाळासाहेब बाकले, भारत भोसले, भारती मस्तुद, आकाश लोंढे व कामगार वर्ग उपस्थित होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *