![]()
शहरात घरफोड्यांच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून, शस्त्रधारी चोरट्यांच्या टोळीने अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. खडकी परिसरातील जिल्हा परिषद कॉलनीत लग्नसमारंभासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला मारत अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ लाख २९ ह
.
खदान पोलिस ठाणे हद्दीत घरफोड्यांचे सत्र खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील १० ते १५ दिवसांत घरफोड्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, शस्त्रधारी चोरटे आधी परिसराची हेरगिरी करून नंतर योग्य संधी साधत चोरी करत असल्याची माहिती आहे. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे असल्याने कोणी विरोध केल्यास हल्ला करण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.