![]()
शेंद्रा एमआयडीसी परिसरात भरधाव हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी चारच्या सुमारास घडली. अपघातानंतर हायवा चालक वाहन सोडून फरार झाला असून, या प्रकरणी चिकलठाणा ठाण्यात गुन्हा नोंद आहे. सौरभ गोविंद तांबे (वय २२, रा. शेंद्रा कामगार वसाहत) असे मृताचे नाव आहे. सौरभ हा आपल्या दुचाकीवरून (एमएच २० ५४०८) प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या भरधाव हायवाने त्याला धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की सौरभ गंभीर जखमी झाला आणि काही वेळातच त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ मदत करत सौरभला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघात घडवून आणणारा चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. संबंधित हायवा वाहनावर नंबर प्लेट नसल्याचे आढळून आले.
Source link
भरधाव हायवाची दुचाकीला धडक:तरुणाचा जागीच मृत्यू, शेंद्रा एमआयडीसीतील घटना, चालक फरार