Headlines

भाजपला सर्वसामान्य जनता नोकर वाटते:मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी केली भाजपवर खरमरीत टीका‎




“मी सत्तेसाठी खासदार झाले नाही, तर जनतेच्या सेवेसाठी खासदार झाले आहे. भाजपला जनता ही आपल्या नोकरासारखी वाटते. दमदाटी, भीती, ईडीचा दबाव आणि जाती-पातीचे गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे. पण, तुमच्या आशीर्वादाने मी अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत राहणार, कारण जनताच जनार्दन आहे, अशा शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार केला. मंगळवेढा तालुक्यातील खूपसंगी, जुनोनी आणि लक्ष्मी दहीवडी येथे आयोजित गावभेट दौऱ्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. खासदार शिंदे पुढे म्हणाल्या, “लाडक्या बहिणींना त्रास दिला जात आहे, निराधार पेन्शन बंद केली जात आहे. या निर्णयांचे पाप सत्ताधाऱ्यांना इथेच फेडावे लागेल. नदीपात्रात दिवसा सर्रास वाळू उपसा सुरू असल्याने पाणी सोडले जात नाही. पाणी अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नसतानाही शेतीपंपांची वीज तोडली जाते. घरकुल योजना केवळ कागदावर असून पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. या दौऱ्यात काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, प्रदेश सचिव रवीकिरण कोळेकर, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, सेवा दल तालुकाध्यक्ष बजरंग चौगुले, आबा पाटील, दामाजी सलगर, राजन ठेंगील, कल्याण गवळी, दत्ता माने, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष संदीप पवार, शहाजहान पटेल, रामचंद्र तांबे, घरेलू कामगार जिल्हाध्यक्ष सुनीता अवघडे, भाऊ जगदाळे, निसारभाई तांबोळी यांच्यासह सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकाऱ्यांना इशारा ^माझे आणि अधिकाऱ्यांचे काम म्हणजे जनतेची सेवा करणे. ज्यांना ते जमत नसेल त्यांनी बदली करून घ्यावी. कोणावर दबाव असेल तर आमच्याकडे या. डीपीडीसी निधी थांबवण्यात आला असून प्रशासनावर प्रचंड दबाव आहे. प्राधिकरणाची कामे आम्ही मार्गी लावू, जनतेने हक्काने आपली कामे करून घ्यावीत. तसेच “लाडक्या बहिणींना त्रास दिला जात आहे, निराधार पेन्शन बंद केली जात आहे. या निर्णयांचे पाप सत्ताधाऱ्यांना इथेच फेडावे लागणार आहे. — प्रणिती शिंदे, खासदार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *