Headlines

राष्ट्रीय विद्युत क्रीडा स्पर्धा:महावितरणची कबड्डी आणि खो-खोमध्ये विजयी घोडदौड, तर खो-खोमध्ये वाईकरच्या नेतृत्वात आगेकूच




एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या 45 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत बुधवारी (दि.6) झालेल्या चुरशीच्या साखळी सामन्यांमध्ये महावितरणच्या पुरुष व महिला संघाने प्रतिस्पर्धी संघावर सहज विजय मिळवला. तर खो-खोमध्ये महावितरणच्या पुरुष संघासह राजस्थानच्या महिला व पुरूष संघाने आगेकूच केली आहे. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज पहिल्या सत्रात कबड्डी, खो-खोचे साखळी सामने झाले. कबड्डीच्या सामन्यांमध्ये महापारेषण संघाने मध्यप्रदेशच्या एमपी पॉवर संघाचा 3 गुणांनी पराभव केला. तर महावितरणने एकतर्फी वर्चस्व गाजवत महानिर्मिती संघाचा 26 गुणांनी पराभव केला. पंजाब पॉवरने उत्तराखंडच्या पॉवर ट्रान्समिशन कंपनीचा 17 गुणांनी आणि हरियाणा संघाने गुजरात संघाचा 30 गुणांनी पराभव केला. कबड्डीच्या महिला गटात हिमाचल प्रदेशने महापारेषण संघाचा 32 गुणांनी तर महावितरणने हरियाणा पॉवर संघाचा 48 गुणांनी एकतर्फी पराभव केला. खो-खोच्या महिला गटात राजस्थान संघाने गुजरात ऊर्जा विकास निगम संघाचा पराभव केला. तर पुरुष गटात हरियाणा पॉवर संघाने मध्यप्रदेश पॉवर संघाचा, राजस्थान विद्युत निगम संघाने गुजरात ऊर्जा विकास निगमचा तर राष्ट्रीय खो-खो संघाचा कर्णधार व महावितरणचा खेळाडू प्रतिक वाईकर याच्या नेतृत्वात महावितरणने हिमाचल प्रदेश राज्य विद्युत मंडळ संघाचा सहज पराभव केला. पहा थरारक फोटो:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *