Headlines

पतीला फसवण्याची धमकी देत पत्नीकडे 10 लाख मागितले:एआय फोटो वापरून खंडणी मागणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल




एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर करून फोटो तयार करत पतीला अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एका महिलेकडून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली असून, महिलेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एक महिला, एक अनोळखी व्यक्ती आणि एक ज्ञात व्यक्ती अशा तिघांचा समावेश आहे. यातील ज्ञात व्यक्तीने त्याच्या मोबाईलवरून तक्रारदार महिलेचे एआय-निर्मित फोटो तयार केले. हे फोटो त्याने तक्रारदार महिलेच्या पतीच्या मोबाईलवर पाठवले. यासोबतच, एका जुन्या प्रकरणाचा आधार घेत, ‘तुमच्या पतीला अत्याचाराच्या गुन्ह्यात फसवू’ अशी धमकी देऊन महिलेकडे १० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. महिलेने खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर, आरोपींनी पुन्हा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून काही फोटो पतीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाठवले. यानंतर, पीडित महिलेने गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *