![]()
भोकरदन तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अंघोळ करतानाचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत तब्बल नऊ वर्षे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेला हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केल्याचेही तपासात समोर आले आहे. पारध पोलिसांनी मुख्य आरोपी व त्याच्या भावाला अटक केली आहे. पीडित तरुणी फेब्रुवारी २०१६ मध्ये इयत्ता नववीत शिकत होती. ती अल्पवयीन असताना तिच्या शेजारी राहणारा विवाहित आरोपी शेख इम्रान शेख हबीब पिंजारी याने तिचे अंघोळ करतानाचे फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या त्रासाला कंटाळून २०१७ मध्ये पीडितेचे कुटुंब छत्रपती संभाजीनगर येथे राहायला गेले तरी आरोपीने तिचा पिच्छा सोडला नाही. २०१८ मध्ये त्याने तिला जबरदस्तीने शहानूरमियाँ दर्गा परिसरातील एका नातेवाइकाच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.त्यानंतरही तो तिला व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्ये करत होता. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार शेख इम्रान शेख हबीब पिंजारी याने युवतीला फोटो व्हायरल करण्याची व जिवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला. अखेर मार्च २०२६ मध्ये त्याने थेट पीडितेच्या घरी जाऊन मारहाण केल्यानंतर घाबरलेल्या कुटुंबाने पारध पोलिस ठाण्यात तक्रार दिली. बुरख्याची सक्ती करत धर्मांतरासाठी दबाव याच काळात आरोपीने पीडितेला कुराण वाचण्यास सांगितले. तिला उर्दू येत नसल्याने उर्दू व मराठी अशा दोन्ही भाषांतील कुराण दिले. फोनवरून नमाज पठण शिकवण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘तुला सौदी अरेबियात जॉब लावून देतो’ असे आमिष दाखवले. आरोपी शेख इम्रानसह त्याचे वडील शेख हबीब, आई शेख बानू आणि भाऊ जुनेद शेख यांनीही तिला घरी बोलावून धर्मांतरासाठी दबाव टाकला. तिला बुरखा घालण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत म्हटले. आरोपींना ५ दिवसांची कोठडी पोलिसांनी शेख इम्रान व त्याला मदत करणारा त्याचा भाऊ शेख जुनेद या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने करत आहेत.
Source link
तरुणीला 9 वर्षे ब्लॅकमेल करत अत्याचार:धर्मांतरासाठी दबाव, संभाजीनगरला आल्यानंतरही पिच्छा सोडला नाही