Headlines

वांगीत विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या:सिल्लोड ग्रामीण ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद‎




तालुक्यातील वांगी येथील एका शेतकऱ्याने अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली. गणपत भीमराव काकडे (५०, रा. वांगी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (५ मे) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गणपत काकडे हे आपल्या राहत्या घरी बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना विषारी औषधाची बाधा झाल्याचे लक्षात येताच, गावातील संतोष काकडे यांनी त्यांना तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, विष अंगात जास्त भिनल्याने उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही आणि रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. गणपत काकडे यांनी नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *