Headlines

मोठी बातमी:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हेलिकॉप्टर अपघात टळला; जुहू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळल्याची माहिती समोर आली असून, महालक्ष्मी रेसकोर्स येथून मुरबाडमधील एका लग्नसोहळ्यासाठी जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर कल्याण परिसरात अचानक आलेल्या वादळात अडकले. सुदैवाने, पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून हेलिकॉप्टरमधील सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत. या थरारक घटनेनंतर उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे जुहू विमानतळावर तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले असून, या प्रसंगावधानामुळे मोठा धोका टळला आहे. कल्याण-मुरबाड येथे एका विवाह सोहळ्यासाठी जात असताना एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर अचानक आलेल्या जोरदार वादळात अडकल्याची धक्कादायक घटना घडली, मात्र वैमानिकाने दाखवलेल्या कमालीच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. मुरबाडमधील खराब हवामान आणि पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी पुढील प्रवास टाळून हेलिकॉप्टर पुन्हा जुहू येथील हेलिपॅडवर उतरवण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने, या आपत्कालीन स्थितीत शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व अधिकारी पूर्णपणे सुखरूप आहेत. कल्याणमधील एका विवाह सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर बापगाव येथील हेलिपॅडवर उतरणार होते, मात्र अचानक आलेल्या वावटळीमुळे दृश्यमानता कमी होऊन हवेत मोठा अडथळा निर्माण झाला. सुरक्षेचा उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे मुंबईतील जुहू येथे तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले असून, या अनपेक्षित बदलानंतर बापगाव हेलिपॅडवर तैनात असलेला पोलिसांचा बंदोबस्त आता पूर्णपणे हटवण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवलीत वादळी वारे दरम्यान, कल्याण-डोंबिवलीमध्ये अचानक वादळी वारा सुटल्याने सर्वत्र धुळीचे लोट पसरल्याची माहिती आहे. या वादळी वाऱ्यात अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. तसेच काही ठिकाणी झाडेही कोसळल्याची माहिती आहे. तर राज्यात अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *