Headlines

मोरगाव, थेऊर, सिद्धटेक मंदिरे महिनाभरासाठी बंद:10 मे ते 9 जून 2026 या कालावधीत होणार काम




अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिरांच्या जतन व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने भरीव निधी उपलब्ध करून दिला असून कामाचा वेग आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता श्रीक्षेत्र मोरगाव, श्रीक्षेत्र थेऊर आणि श्रीक्षेत्र सिद्धटेक ही तीन मंदिरे १० मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत भाविकांसाठी दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या दोन महिन्यांपासून श्री मयूरेश्वर मंदिर (मोरगाव), श्री चिंतामणी मंदिर (थेऊर) आणि श्री सिद्धिविनायक मंदिर (सिद्धटेक) येथे दुरुस्तीची कामे प्रगतिपथावर आहेत. मुख्य गाभारा आणि सभामंडप यांचे पौराणिक काळातील मूळ दगडी बांधकाम पुन्हा सुबक स्वरूपात आणण्यासाठी हे संवर्धन कार्य केले जात आहे. दगडी बांधकामाचे हे काम अत्यंत किचकट आणि संवेदनशील असल्याने, कामाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी अडथळा ठरू शकते. यामुळे कामाचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने मंदिर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. सहधर्मादाय आयुक्तांचे आदेश: पुरातत्त्व विभागाच्या संचालकांनी यासंदर्भात पुणे विभागाच्या सहधर्मादाय आयुक्तांकडे मंदिरे बंद ठेवण्याची विनंती केली होती. पुरातत्त्व विभाग, मंदिर प्रशासन, पुजारी आणि ग्रामस्थ यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सहधर्मादाय आयुक्तांनी ७ मे रोजी हे आदेश निर्गमित केले. नित्य पूजा सुरू राहणार ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, १० मेपासून पुढील एक महिना भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश मिळणार नाही. तथापि, मंदिरातील परंपरेनुसार होणारी श्रींची नित्य पूजाअर्चा आणि इतर धार्मिक विधी नियमाप्रमाणे सुरू राहतील. मंदिर परिसरात केवळ पुजारी, बांधकाम यंत्रणेचे कर्मचारी, अधिकारी आणि विश्वस्ताना प्रवेश असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *