Headlines

कॉर्पोरेट जिहाद:बॉडीगार्डच्या बहाण्याने 5 प्रश्न विचारताच एमआयएमचा नगरसेवक मतीनने दिली निदाला आश्रय दिल्याची कबुली




टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानला ७ मे रोजी छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती. गेल्या ४१ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारी निदा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलच्या नारेगाव भागातील घरात राहत होती. पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून आधी नगरसेवकाला बॉडीगार्डच्या बहाण्याने पोलिस आयुक्तालयात बोलावले. त्याला मोजके पाच प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरे देताना मतीनची बोबडी वळली. निदा खानला आपल्या घरात कुटुंबासह लपवून ठेवल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी पटेलला बोलते करण्यासाठी खेळी खेळली. संशय येऊ नये म्हणून त्याला पोलिस आयुक्तालयात बोलावले. निवडणूक काळातील तुमच्या पोलिस बॉडीगार्डविषयी अधिकृत स्टेटमेंट घ्यायचे आहे, असे त्याला सांगण्यात आले. त्यानुसार तो पोहोचताच अधिकाऱ्यांनी त्याला घेरले. सुरुवातीला त्याने आपल्याला निदा खानबद्दल काहीच माहिती नसल्याचा दावा केला. तेव्हा तुझ्याविरुद्धच्या जमीन खरेदी तक्रारीची चौकशी करू असे सांगत पोलिस खाक्या दाखवताच त्याने निदाला आश्रय दिल्याची कबुली दिली. निदाचा भाऊ एमआयएमचा कार्यकर्ता असल्याचे निदर्शनास आले. मतीनला सोबत घेऊनच टाकली धाड नाशिक गुन्हे शाखा आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकरांनी मतीनला सोबत घेऊन नारेगावातील कौसर पार्कमधील फ्लॅटवर धडक देत निदाला ताब्यात घेतले. हे घर मतीनने काही महिन्यांपूर्वीच खरेदी केले होते. मतीन यंदा पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आला. त्याचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. निदा प्रकरणात येऊ शकते गंडांतर आरोपीला आश्रय किंवा तपासात अडथळा हा गुन्हा सिद्ध झाला. न्यायालयाने २ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा सुनावली, तर मतीन पटेलचे नगरसेवकपद रद्द होते. महाराष्ट्र मनपा कायद्याच्या कलम १३ नुसार राज्य सरकार चौकशीअंती त्याला पदावरून बडतर्फ करू शकते. ४८ तासांपेक्षा जास्त काळ पोलिस कोठडीत राहिला तर सदस्यत्व तात्पुरते निलंबित होऊ शकते. पोलिस अधिकारी पोहोचले इम्तियाज जलील यांच्या घरी नाशिक पोलिसांना आधी निदाचे लोकेशन सिडको बसस्थानक परिसरात मिळाले होते. ती कुटुंबासह सोलापूर येथून संभाजीनगरात आली होती. तिच्या भावाने मतीनला कॉल केल्यावर मतीनने या कुटुंबाला आपल्या घरात आश्रय दिला. धक्कादायक बाब म्हणजे आश्रय दिल्यानंतर मतीनने तिची एमआयएमच्या एका बड्या नेत्याशी भेट घडवून आणली होती. तुला लवकरच जामीन मिळेल, असा विश्वासही या नेत्याने तिला दिला. दरम्यान, एक वरिष्ठ पोलिस अधिकारी शुक्रवारी दुपारी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी पोहोचले होते. बंदोबस्तासाठी ही भेट होती, असा दावा पोलिसांनी केला. निदाला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन नाशिक पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा मोबाइल जप्त केला आहे. त्यांच्या कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *