![]()
एकीकडे उन्हाचा तीव्र वाढता कडाका आणि दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई यामुळे हट्टी गावातील नागरिकांचे हाल होत आहेत. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असतानाही ग्रामस्थांना तब्बल दहा ते बारा दिवसांनी पाणी मिळत असल्या
.
गावात पुरेसे पाणी उपलब्ध असूनही नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना टँकरचे विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या अनेक कुटुंबांना दररोज पाण्यासाठी अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असून नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. विहिरींची तत्काळ स्वच्छता करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाकडे संघटितपणे आवाज उठवण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा येणाऱ्या काळात हट्टी गावातील पाणी प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दहा दहा दिवसांआड पाणी येत असल्यामुळे गावातील महिलांना शेतात पायी चालत जाऊन पाण्याचे हंडे डोक्यावर आणावे लागत आहे.
गावात पाणी भरपूर, तरी ग्रामस्थ तहानलेले गावात दोन विहिरींमध्ये भरपूर पाणी असताना आम्हाला दहा-दहा दिवस पाण्यासाठी वाट पाहावी लागते, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचलेली असून तेच दूषित पाणी नागरिकांना पिण्यासाठी दिले जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने तत्काळ विहिरींची स्वच्छता करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. जनार्धन जरारे, सोसायटी चेअरमन