![]()
उपेक्षित समाज महासंघ व कै.मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे राजर्षी छ.शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ६ मे रोजी डॉ.राजिया सुलताना यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड, सत्कारमूर्ती ज्येष्ठ पुरोगामी लेखिका डॉ.रजिया सुलताना तर सुप्रसिद्ध अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले हे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक होते. अध्यक्ष सत्कारमूर्ती व प्रमुख वक्ते यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी “बहुजन नायक’ या स्वरचित अभंगाचे गायन प्रा.अरुण बुंदेले यांनी केले. डॉ. रजिया सुलताना यांचा त्यांचे पुणे येथे भव्य समारंभात “गाडगेबाबांच्या कीर्तनातील समाजचिंतन’ हे ४० वे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाल्याबद्दल त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन उपेक्षित समाज महासंघ व कै.मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणातून समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी हिंदू समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी भिन्न – भिन्न जातीमध्ये आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला. जेवढ्या प्रमाणावर आंतरजातीय विवाह होतील तेवढ्या प्रमाणावर हिंदू समाजातील जातीभेद नष्ट होईल, तेव्हाच देशाची प्रगती होईल. असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन गोविंद फासाटे व आभार रामकुमार खैरे यांनी मानले. कार्यक्रमाला फुले – शाहू – आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराज महान भारतीय समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज एक महान भारतीय समाजसुधारक होते. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी मोठे पाऊल उचलले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमधील प्रतिभा त्यांनी ओळखून त्यांच्या ‘मूकनायक’ वृत्तपत्रासाठी आणि उच्च शिक्षणासाठी मोलाचे आर्थिक सहकार्य केले होते. १९२० च्या माणगाव परिषदेत त्यांनी जाहीर केले की, “तुम्हाला तुमचा डॉ.आंबेडकरांच्या रूपात नेता मिळाला आहे, ते फक्त तुमचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे नेते होतील.”आज त्यांची गोष्ट खरी ठरलेली आहे. त्यांच्या गौरवार्थ कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल केली. शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने ‘रयतेचे राजा’ होते.”असे विचार सत्कारमूर्ती डॉ.रजिया सुलताना यांनी व्यक्त केले.
Source link
शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा मंजूर केला:प्रा.श्रीकृष्ण बनसोड, डॉ. रजिया सुलताना यांचा सत्कार