![]()
“मी कधीही रात्र रात्रभर जागून किंवा पहाटे उठून तासनतास अभ्यासही केला नाही. मात्र, जेव्हा अभ्यास करायची, तेव्हा फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायची. तसेच आज इतक्यावेळात इतका अभ्यास पुर्ण करायचाच, असे स्वतःलाच चॅलेंज द्यायची आणि ते पूर्णही करायची. विशेष म्हणजे, अभ्यासासाठी आई-वडिलांनी कधीही ताण दिला नाही. इतकेच टक्के गुण मिळव, असेही त्यांनी कधी सांगितले नाही. सोशल मीडियाच्या आहारी गेले नाही, पण युट्युबचा मात्र मी अभ्यासात ‘स्मार्ट’ वापर केला. असे दहावीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या रिद्धीने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. अंजनगाव सुर्जी येथील रायसाहेब मोती संगई विद्यालयातील रिद्धी ओमप्रकाश शर्मा असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. रिद्धीचे वडील शेतकरी असून आई कोतवाल म्हणून कार्यरत आहे. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील रिद्धीने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवत यश संपादन केले. रिद्धीने सांगितले की, “मी कधीही तासनतास अभ्यास करत नव्हते. मात्र, जितका वेळ अभ्यास करायची, तो पूर्ण एकाग्रतेने आणि मन लावून करायची. मला ९९ टक्के गुण मिळतील, अशी अपेक्षा होती; पण शंभर टक्के गुण मिळाल्यामुळे प्रचंड आनंद झाला आहे. मोबाईल वापराबाबत तिने सांगितले की, “मी वर्षभर मोबाईल वापरला; मात्र अभ्यासाच्या वेळी मोबाईल स्विच ऑफ करत होते. सोशल मीडियापासून पूर्णतः दूर होते आणि अजूनही आहे. मोबाईलचा वापर केवळ अभ्यासासाठी आणि कॉलवर बोलण्यासाठीच करत होते, असे सांगितले. रिद्धीने सांगितले की, “मोबाईलचा वापर मी फक्त अभ्यासासाठीच केला. परीक्षेच्या काळात पहाटे ६ ते ८ या वेळेत संबंधित विषयांवर युट्युबवरील तज्ज्ञांचे व्हिडिओ पाहायची. लवकरच इस्रायलमध्ये जाण्याची संधी मिळणार रिद्धीने काही दिवसांपूर्वी ‘एम’सॅट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेत गुणवत्तेनुसार निवड झालेल्या राज्यातील २० विद्यार्थ्यांना इस्रायलमध्ये जाण्याची संधी मिळणार असून त्यामध्ये तिचा समावेश आहे. त्या ठिकाणी इस्त्रोला भेट देण्याची संधीही मिळणार असल्याचे तिने सांगितले. निकालाच्या चिंतेने रात्री अश्रू अनावर निकालाच्या आधल्या रात्री (गुरूवारी) रिद्धीला निकालाची चिंता सतावत होती. “काय निकाल लागेल?” या विचाराने ती गुरुवारी रात्री भावूक होऊन रडलीही. मात्र, स्वतःलाच समजावत तिने सावरले. शुक्रवारी तिच्या मैत्रिणींनी तुला शंभर टक्के गुण मिळाले, असे सांगितले. सुरुवातीला ती गंमत करत आहेत, असे तिला वाटले.
Source link
आत्मविश्वास:सोशल मीडियाला ‘नो'', पण युट्युबचा केला ‘स्मार्ट'' वापर, अंजनगावच्या रिद्धीने गाठलं दहावीच्या परीक्षेत 100 टक्क्यांचे शिखर