![]()
शहरातील प्रभाग क्र १ च्या नगर सेविका रेशमा परवीन अजीम इनामदार यांनी प्रभागात नाले सफाई आणि कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने स्वतः हातात घमेले आणि फावडे घेऊन वॉर्डात साफसफाई करावी लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घंटागाडी प्रभागात येत न
.
७ मे रोजी सोशल मीडियावर प्रभाग क्र १ च्या नगर सेविका यांना स्वतः रस्त्यावर उतरून हातात फावडा आणि घमेला घेऊन प्रभागातील कचरा गोळा करतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओ नंतर न.प. च्या संबंधित विभागच्या कार्यप्रणालीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. शहरातील न.प, वर भाजपची एकहाती सत्ता आहे. अशावेळी प्रभागात कचरा संकलनावरून भेदभाव होत असल्याचा आरोप नरसेविका यांनी केला आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर खळबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने या प्रभागात नियमित साफसफाई होत असल्याचे जिओ टॅगिंग फोटो समोर आणले आहेत. ज्या ठिकाणी नगर सेविका हातात फावडे घामेले घेऊन आंदोलन करत आहेत. त्या ठिकाणची देखील साफसफाई पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली असल्याचे आरोग्य निरीक्षक अक्षय फडतरे यांनी सांगितले.
याबाबत आरोग्य सभापती मनिष कराळे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संपूर्ण शहरात साफसफाई नियमित केली जात असून, ज्या ठिकाणी कचरा गोळा करायचा बाकी असेल अशा ठिकाणी वाहन पाठवून कचरा संकलित केला जात असल्याचे सांगितले.
एकंदरीत घटनेवरून येत्या काही काळात पालिकेत कचऱ्याच्या मुद्यावर सभा गाजणार असल्याचे दिसून येत असून, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा कलगीतुरा रंगणार असल्याचे दिसत आहे.
नियमित साफसफाई न झाल्यास न.प. कचरा फेको प्रभाग क्र १ मध्ये गेल्या काही दिवसांपासून सांगून सुद्धा साफसफाई केली जात नसल्याने प्रभागात दुर्गंधी पसरल्याचा आरोप त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला असून. नियमित साफसफाई न झाल्यास पुढे नगर पालिकेत कचरा फेकून देऊ. -रेशमा परवीन अजीम इनामदार, नगर सेविका.