![]()
पातूर तालुक्यातील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या पातूर तालुक्यातील नराधमास फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करीत वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी िजल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
.
६० वर्षीय वृद्धाने दहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना ५ मे रोजी उघडकीस आली होती. पीडिता व आरोपी एकमेकांच्या शेजारी राहत होते. मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर आरोपीवर गुन्हा दाखल झाला. मात्र आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. पोलिसांनी आरोपी जयराम गोविंदा आडे (६०) याला गुरुवारी सावरगाव (ता. पातूर) जंगलातून अटक केल होती. आरोपीच्या शोधासाठी १०५ पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली होती. आरोपीला अटक करण्यासाठी वनविभागानेही मदत पोलिसांना सहकार्य केले. दरम्यान वंचित बहुजन आघाडी जिल्हा व महानगर यांच्या वतीने आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, माजी जि. प. गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, माजी जिल्हाध्यक्ष प्रभा सिरसाट, महिला जिल्हा महासचिव संगीता अढावू, युवा जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, महानगर अध्यक्ष मजहर खान, महानगर महासचिव गजानन गवई, बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष गोरसिंग राठोड, अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामणिक, माजी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, महिला तालुकाध्यक्ष लक्ष्मीताई वानखडे, मंगलाताई शिरसाट, तालुका कार्याध्यक्ष पवन बुटे, तालुका महासचिव शरद इंगोले, नगरसेवक पराग गवई, नगरसेविका उज्वला पातोडे, जयश्री बहाद्दूरकर, नगरसेवक शेख शमशू, सुनील इन्नाणी, रूग्णसेवक नितीन सपकाळ, महिला महानगर महासचिव ज्योती खिल्लारे, प्रदिप सिरसाट, माजी सभापती वसंतराव नागे, माजी उपसभापती अजय शेगावकर, किशोर तेलगोटे, सचिन सिरसाट, अविनाश खंडारे, संतोष किर्तक, डॉ शंकरराव राजुस्कर, विश्वजित खंडारे, दुर्गा अवचार, संकेत सिरसाट, श्रीकृष्ण देवकुणबी, आकाश जंजाळ, नागेश उमाळे, माया इंगळे उपस्थित होते.
तातडीने कठोर शिक्षेची मागणी जिल्ह्यात पोलिसांचा वचक न राहिल्याने मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असल्याची टिका वंचित बहुजन आघाडीने निवेदनात केला आहे. रोज खून, प्राणघातक हल्ले, लुटमार व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही उलट असे गुन्हे आणखी वाढतच आहेत. पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावात निंदनीय व क्रृर घटना घडली असून, या प्रकार महाराष्ट्राला हादरवून सोडणारा आहे. आई वडिल मजुरीवर गेले असता घरात एकट्या असणाऱ्या एका १० वर्षीय चिमुरडीवर गावातील नराधमाने लैंगिक अत्याचार केला व त्या पिडीत चिमुरडीची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे याप्रकरणी तातडीने कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीही मागणी वंचितने केली आहे.