Headlines

कर्जमुक्ती योजनेत 66,147 शेतकऱ्यांना 627.40 कोटी:2.41 हजार कोटी‎रुपयांच्या माफीची प्रतीक्षा‎




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६६ हजार १४७ थकीत पीक कर्जदार शेतकरी सभासदांच्या खात्यावर ६२७.४७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्हा बँकेच्या २७७ शाखांमार्फत १३६६ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. बँकेच्या प्रशासक संगिता डोंगरे यांनी ही माहिती दिली. शासनाकडून आधारप्रमाणीकरणासाठी प्राप्त झालेल्या पहिल्या यादीतील १ लाख १६ हजार ५१२ कर्जदार सभासदांपैकी १ लाख ५ हजार २२८ सभासदांचे आधारप्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तर ११ हजार २८४ शेतकरी सभासदांचे प्रमाणीकरण विविध कारणांमुळे अद्याप झालेले नाही. यामध्ये मयत सभासद, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नसणे, परगावी किंवा स्थलांतरित असणे, बायोमॅट्रिक कॅप्चर न होणे आदी कारणांचा समावेश आहे. आव्हानात्मक कामे नियोजनबद्ध पूर्ण करून राज्यात २.४१ हजार कोटी रुपयांच्या माफीची प्रतीक्षा जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या थकीत पीक कर्जदार सभासदांची १ लाख ९२ हजार २८२ कर्जखाते व त्यावरील २ हजार ४१९ कोटी रुपयांची रक्कम शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यापैकी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जखात्यांची संख्या १ लाख ६१ हजार २१७ असून त्यांची रक्कम १ हजार ४९५ कोटी रुपये आहे. तर योजनेतील ओटीएसअंतर्गत ३१ हजार ६५ कर्जखाती असून त्यांची रक्कम ९२३.७८ कोटी रुपये आहे. अहिल्यानगर जिल्हा बँक अव्वल स्थानावर असल्याची माहितीही डोंगरे यांनी दिली. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी परिश्रम घेणाऱ्या यंत्रणेचे आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *