Headlines

नसरापूर प्रकरण:आरोपीला फाशीच्या मागणीसाठी पुण्यात 'मूक मोर्चा'; पीडितेच्या वडिलांचे उपस्थित राहण्याचे भावूक आवाहन




नसरापूर येथील धक्कादायक अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीला कठोरातील कठोर म्हणजे फाशीचीच शिक्षा व्हावी, या मागणीसाठी उद्या रविवार, 10 मे रोजी पुण्यात ‘मूक मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी स्वतः या न्यायाच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी पत्रकार बांधव आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन केले आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून पत्रकार बांधव तसेच नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, आज आमच्या मुलीला त्या नराधमाने हिरावून घेतले. आज आमच्या घरात संपूर्ण शांतता आहे. ही शांतता नसून दररोजचा एक मृत्यूच आहे. त्यासाठी मी सगळ्या आई-वडिलांना एक नम्र विनंती करतो की 10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता बालगंधर्व चौक ते स्वातंत्र्यवीर स्मारक पुतळा इथे एक मुक मोर्चाचे नियोजन आपल्या विविध संघटनांनी केले आहे. अशा नराधमांना कठोरात कठोर कारवाई व्हावी पुढे बोलताना ते म्हणाले, सर्व आई-वडिलांना मी हात जोडून विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या मुक मोर्चासाठी उपस्थित राहून निषेध नोंदवावा. अशा नराधमांना कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि आपल्याला न्यायव्यवस्थेला दाखवून द्यायचे आहे की समाज अजूनही जीवंत आहे. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि माझ्या चिमुकलीला न्याय मिळवून द्यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. दरम्यान, नसरापूर येथे 1 मे रोजी 65 वर्षीय नराधम भीमराव कांबळेने 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिचा खून केला. या घटनेनंतर लोकांनी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र, पोलिस कोठडीत तो तोंड उघडत नव्हता. कोर्टासमोरही त्याने निर्लज्जपणे असे सांगितले की, किरकोळ वादातून मला या प्रकरणात गुंतवण्यात आले आहे. नराधमाच्या पोलिस कोठडीत 12 मेपर्यंत वाढ त्यामुळे पोलिस साक्षी-पुरावे गोळा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून नराधम कांबळेने खुनाची कबुली नसरापूर गावातील एका व्यक्तीला दिली होती. माझी चूक झाल्याचे सांगत, मी मुलीला मारले असल्याचे त्याने संबंधित व्यक्तीला सांगितले. या साक्षीदाराने ही अत्यंत महत्त्वाची पोलिसांना दिली आहे. दरम्यान, नराधमाच्या पोलिस कोठडीत 12 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *