Headlines

‘जानुबाईच्या नावानं चांगभलं' च्या जयघोषात भोसे नगरी दुमदुमली:पारंपरिक वाद्ये, लेझीम पथक आणि फटाक्यांच्या आतषबाजीत छबिना‎




“जानुबाईचं चांगभलं… कोकणच्या आईचं चांगभलं…” अशा भक्तिमय जयघोषात, नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी भोसे (ता. पंढरपूर) येथील श्री जानुबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. हलगी, लेझीम आणि गजीढोल अशा पारंपारिक वाद्यांच्या गजराने संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. यात्रेचा प्रारंभ गुरुवार (दि. ७) रोजी रात्री बारा वाजता देवीच्या महापूजेने झाला. तत्पूर्वी गायकवाड साहेब व मलिक साहेब यांच्या हस्ते देवीला नैवेद्य अर्पण करण्यात आला. शुक्रवार (दि. ८) रोजी सकाळी १०:३० वाजता स्व. खटके अप्पा मित्र मंडळाच्या शिवछत्रपती तरुण मंडळाने, तर दुपारी ३ वाजता स्व. राजूबापू पाटील मित्र मंडळाच्या वतीने शेरण्या काढल्या. यावेळी वाद्यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. दिवसभर कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या भाविकांना सायंकाळी पावसाच्या हलक्या सरींनी मोठा दिलासा दिला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने भाविकांच्या उत्साहात अधिकच भर पडली. यात्रेनिमित्त मेवामिठाई, खेळणी आणि स्टेशनरीच्या दुकानांनी गाव फुलून गेले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी आले होते, विशेषतः सासुरवाशिणी आपल्या कुटुंबासह माहेरच्या देवीचा नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मंदिरावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यात्रा कमिटीसह सरपंच अॅड. गणेश पाटील यांच्या नेटक्या नियोजनामुळे यात्रा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या यशस्वी आयोजनाबद्दल दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी समाधान व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *