Headlines

धर्मांतर विरोधी कायदा कडक:चौकशीनंतरच एमआयएम पदाधिकाऱ्यांवर कारवाई- दीपक केसरकर




धर्मांतराचे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, धर्मांतर विरोधी कायदा आता अत्यंत कडक करण्यात आला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, राज्यात बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांना थारा दिला जाणार नाही. एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईबाबत बोलताना केसरकर म्हणाले की, ही कारवाई पूर्वग्रहातून झालेली नसून सखोल चौकशीनंतरच करण्यात आली आहे. चौकशीत दोषी आढळल्यामुळेच संबंधित पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर पाऊले उचलण्यात आली आहेत. धर्मांतर हा प्रकार मुळातच बेकायदेशीर आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई होत असताना कोणीही त्याचे समर्थन करू नये, हे माझे स्पष्ट मत आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. शाईफेकसारखे प्रकार होऊ नये विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणावर केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटनांमुळे सार्वजनिक जीवनात काम करणे कठीण होते. शाईफेक सारखे प्रकार लोकशाहीला धरून नाहीत आणि ते पुन्हा घडू नयेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सावंतवाडी क्रीडा संकुल उभे राहणार सावंतवाडीच्या विकासाबाबत माहिती देताना केसरकरांनी खेळाडूंसाठी महत्त्वाची माहिती दिली. सावंतवाडीत सर्व सोयींनी युक्त असे परिपूर्ण क्रीडा संकुल उभे राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या संकुलामुळे स्थानिक खेळाडूंना सरावासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील टॅलेंटला योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांनी जागतिक स्तरावर चमकवावे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे केसरकर यांनी नमूद केले. सिंधुदुर्गातील डॉक्टरांची रिक्त पदे महिनाभरात भरणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत. याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसत असून, वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन दीपक केसरकर यांनी नुकतीच आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले. रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी तातडीने पदे भरण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती. यावर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये रिक्त असलेली वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे आगामी महिनाभरात भरली जातील, असे आदेश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले असल्याची माहिती शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *