Headlines

अमरावतीजवळ डबा पार्टीस गेलेल्या भावंडांसह चार जणांचा तलावात बुडून मृत्यू:घातखेडा तलावातील गाळात एकामागाेमाग चाैघेही अडकले




अमरावतीमधील खोलापुरी गेट परिसरातील दहा मुले-मुली रविवारी शहरापासून १० किमी अंतरावरील घातखेडा तलावाजवळ डबा पार्टीसाठी गेले होते. जेवणानंतर पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या १२ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात एकामागोमाग चौघेजण तलावातील गाळात अडकले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सोनाली नरेंद्र जोशी (१६), आदित्य ऊर्फ मानव नरेंद्र जोशी (१३), पायल बबलू पंडित (२१), यश गजानन काकणे (१३, सर्व रा. खोलापुरी गेट) अशी मृतांची नावे आहेत. या चौघांव्यतिरिक्त त्यांचे नातेवाईक व मित्रमैत्रिणी असे एकूण दहा जण रविवारी दुपारी घातखेडा तलावाजवळ डबा पार्टीसाठी गेले होते. जेवणानंतर आदित्य उर्फ मानव पोहण्यासाठी पाण्यात उतरला. तो गाळात अडकला. त्याला वाचवण्यासाठी गेलेली मोठी बहीण सोनाली, मैत्रीण पायल, यश पाण्यात गेले. पण तेही गाळात अडकलून बुडाले. नंदिनी काकणे हिने धावत घातखेडा गावातील गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर मृतदेह काढले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *