Headlines

रस्त्यावरील भेगेमुळे अपघात; युवक ठार‎:रस्त्यावर अनेक ठिकाणी‎भेगा, सिमेंटचे थर ‘जैसे थे’‎




प्रतिनिधी | खुलताबाद फुलंब्री महामार्गावरील सुलतानपूर शिवारात शनिवारी सायंकाळी सिमेंट रस्त्याला पडलेल्या धोकादायक भेगेत दुचाकीचे चाक अडकल्याने झालेल्या अपघातात एका १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. निखील अंबादास पवार (१८, रा. चौका, ता. फुलंब्री) असे मृत तरुणाचे नाव आहे. निखिलने नुकतीच नवीन दुचाकी खरेदी केली होती. नवीन वाहन घेतल्याचा आनंद साजरा करत तो शनिवारी सायंकाळी खुलताबाद येथे दर्शनासाठी घरातून निघाला होता. सिमेंट रस्त्याच्या मधोमध पडलेल्या मोठ्या भेगेमध्ये त्याच्या दुचाकीचे पुढील चाक अडकले. वाहनावरील ताबा सुटला आणि निखील जोरात रस्त्यावर फेकला गेला. खुलताबाद ते फुलंब्री हा सुमारे २५ किलोमीटरचा राज्य महामार्ग काही वर्षांपूर्वी मोठ्या निधीतून सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला होता. मात्र सुरुवातीपासूनच रस्त्याच्या अनेक भागांमध्ये मोठमोठ्या भेगा पडल्या असून काही ठिकाणी सिमेंटचे थर उखडले आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *