![]()
प्रतिनिधी | फर्दापूर अजिंठा घाटातील अपघाताची मालिका सुरूच असून, शुक्रवार आणि शनिवारनंतर पुन्हा रविवारी घाटात ट्रॅव्हल्स आणि मालवाहतूक ॲपेचा समोरासमोर अपघात झाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जळगावला दाखल केले आहे. दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक एक तास खोळंबली होती. अजिंठा घाटात रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडुन ट्रॅव्हल्स बस (एमपी ६८ झेड ८८४४) ही प्रवासी घेऊन जळगावकडे जात होती. याचवेळी अजिंठा घाट उतरताना एका वळणावर समोरून मालवाहतूक करणारा ॲपे (एमएच १७ पी ३५४३) येत होता. अवघड वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात ॲपेतील तन्वीर शेख रऊफ (२७), अरबाज शकील शेख (३० दोघेही रा. वाकोद, ता. जामनेर) हे दोघे गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच घटनास्थळी अजिंठा व फर्दापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजुला करून तासाभरात वाहतूक सुरळीत करण्यात आली. अजिंठा घाटात शुक्रवारी ट्रक आणि एसटी बसचा अपघात झाल्याने दोन तास वाहतूकीची कोंडी झाली होती. पुन्हा शनिवारी कार आणि ट्रकचा अपघात झाल्याने दोन तास आणि रविवारी ॲपे आणि ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याने एक तास वाहतूकीची कोंडी झाली. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीस अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. मागील तीन दिवसांपासून वाहतूकीचा खोळंबा कायम
Source link
अजिंठा घाटात ट्रॅव्हल्स-ॲपेचा अपघात; १ तास वाहतूक कोंडी:दोन जण गंभीर जखमी, ३ दिवसांत तिसऱ्यांदा घडला अपघात