![]()
प्रतिनिधी | दिंडोरी दिंडोरी वनपरिक्षेत्रातील कोराटे येथील न्याहारी माता डोंगराला शनिवारी (दि. ९) सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत सुमारे २५ एकर परिसर भस्मसात झाला असून जवळपास दोन हजार झाडांचे नुकसान झाले आहे. या आगीत डोंगरावरील जैवविविधतेलाही मोठा फटका बसला. वनविभाग आणि स्थानिक निसर्गप्रेमी नागरिकांनी जीवाची बाजी लावत तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर वणवा आटोक्यात आणला. या उन्हाळ्यात न्याहारी माता डोंगराला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून भाऊसाहेब चव्हाणके व त्यांचा मित्रपरिवार या परिसरात वृक्षारोपण आणि संवर्धनाचे काम करत आहेत. शनिवारी सायंकाळी डोंगराच्या एका भागातून आगीचे लोट दिसताच स्थानिक नागरिकांनी तातडीने { उर्वरित पान. ३ या उन्हाळ्यात न्याहारी माता डोंगराला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. डोंगराला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याने ही आग मुद्दाम लावण्यात आल्याचा संशय निसर्गप्रेमींनी व्यक्त केला आहे. या घटनेचा पंचनामा करून जबाबदारांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
Source link
न्याहारी माता डोंगराला आग; दोन हजार झाडांचे नुकसान:वनविभाग व नागरिकांनी तासभर प्रयत्नांनी विझवली आग