Headlines

सुषमा अंधारे हक्कभंग समितीसमोर हजर:कुणाल कामराचा व्हिडिओ शेअर करणे पडले महागात; एकनाथ शिंदेंवरील विडंबन काव्य प्रकरण




सुषमा अंधारे विधान भवनात हक्कभंग समितीसमोर हजार झाल्या आहेत. कालच रुपाली चाकणकर यांना त्यांनी चौकशीला सामोरे जावे लागल्याने टोला लगावला होता. आता आज अंधारे यांनाही चौकशीला सामोरे जावे लागले आहे. समितीसमोर सुषमा अंधारे यांची बाजू मांडणार आहेत. स्टँडअप कमेडियन कुणाल कामराने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केले होते व त्याला सुषमा अंधारे यांनी पाठिंबा देत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या प्रकरणी अंधारे यांच्यावर हक्कभंगाची कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आज त्या चौकशी समितीसमोर हजर झाल्या असल्याचे समजते. स्टँडअप कमेडियन कुणाल कामराने आपल्या एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक विडंबन काव्य सादर केले होते. त्यात त्याने एकनाथ शिंदे यांना उद्देशून ‘गद्दार’ शब्दाचाही उल्लेख केला होता. कुणाल कामराचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यात सुषमा अंधारे यांनी देखील त्याचा व्हिडिओ शेअर करत शिवसेना शिंदे गटाला डिवचले होते. त्यानंतर कामरा आणि अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या पूर्वी सुषमा अंधारे यांनी प्रकृतीचे कारण पुढे करत चौकशीला सामोरे जाण्यास टाळले होते. मात्र आज दुपारी 2 वाजता त्या विधान भवनात हक्कभंग समितीसमोर हजर झाल्या असून आपली साक्ष नोंदवणार आहेत. तसेच सुषमा अंधारे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचेही समजत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *