![]()
प्रतिनिधी | शिऊर वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी (११ मे) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रामगृहासमोरील गॅरेजला आग लागली. ही बाब कुणाच्याही लक्षात न आल्याने शेजारची दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. तासाभरात आठ ते दहा दुकानांना भीषण आग लागली. दुकान, हॉटेल, पानटपरी, पंक्चर दुकानासह इतर छोट्या-मोठ्या दुकानांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळापासून काही फुटांवर पेट्रोल पंप आहे. दैव बलवत्तर म्हणून आगीची ठिणगी पेट्रोल पंपाकडे उडाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. हॉटेल व दुकान व्यावसायिकांनीही प्रयत्न केला. परंतु आग वेगाने पसरली. खबरदारी म्हणून इतर व्यावसायिकांनी साहित्य बाहेर काढले.
Source link
शिऊर येथील हॉटेलसह 8 दुकानांना लागली भीषण आग:जीवितहानी नाही, आगीत झाले लाखोंचे साहित्य जळून खाक, साेमवारी पहाटेची घटना