Headlines

बार्शीतील प्रलंबित 2457 प्रकरणे निकाली; 2 कोटींचा महसूल जमा:राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी 78 तर दाखलपूर्व 2379 प्रकरणात तडजोड‎




बार्शी तालुका विधी सेवा समिती व वकिल संघ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती बार्शी तथा जिल्हा न्यायाधीश १ विक्रमादित्य के. मांडे यांचे अध्यक्षतेखाली बार्शी न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय महा लोकअदालतीत ७८ प्रलंबित दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी खटले व दाखल पुर्व २३७९ असे एकुण २४५७ इतकी प्रकरणे राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये तडजोडीने निकाली काढून सुमारे २ कोटी रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा करण्यात आला. राष्ट्रीय महा लोकअदालतीत प्रलंबीत प्रकरणात अनुक्रमे १ कोटी ५१ लाख ६६ हजार १९१ रूपये व दाखलपुर्व प्रकरणांत ७५ लाख ६६ हजार ७४ रूपयांची वसुली झाली या राष्ट्रीय महा-लोकअदालतीत बार्शी न्यायालयात प्रलंबीत असलेले दिवाणी व फौजदारी असे ३७२१ व दाखलपुर्व ६५०४ असे एकुण १०२२५ प्रकरणे लोकअदालत पॅनल मध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या लोक अदालती मध्ये बार्शी न्यायालयातील एकुण चार पॅनल करण्यात आले होते. त्यात जिल्हा न्यायाधीश वर्ग १ विक्रमादित्य के. मांडे , सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती पी. व्ही. राऊत, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती एच. यु. यु. पाटील, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती आर.पी. बागडे असे एकुण चार पॅनल होते. तसेच २रे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती जी. एस. पाटील, यांचे गुन्हा कबुलीचे विशेष न्यायालय चालु ठेवण्यात आले होते. न्यायालयातील प्रलंबीत कबुलीची ५७ प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. विशेष बाब म्हणजे पॅनल क्र. ४. श्रीमती आर. पी. बागडे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर यांचे पॅनलसमोर वयोवृध्द पक्षकार सखुबाई शंकर गवळी यांचे तडजोडीकामी न्यायाधीश स्वतः दालनाबाहेर गेले व तडजोडीबाबत पुर्तता केली. अपघात प्रकरण निकाली… जिल्हा न्यायालयातील मोटार अपघात प्रकरणांत एकुण १ प्रकरण तडजोडीने मिटुन त्यात सुमारे १२ लाख हजार इतक्या रक्कमेची नुकसान भरपाई मंजुर करण्यात आली. एन. आय. ॲक्ट १३८ च्या एकुण १३ प्रलंबित प्रकरणांत तडजोड होवुन त्यात सुमारे २० लाख १७ हजार ६०० रूपयांची वसुली तर रक्कम वसुलीच्या ०१ प्रकरणांत तडजोड होवुन त्यात १० लाख १९ हजार ८८१ रूपयांची वसुली झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *