Headlines

आसाममध्ये शपथविधीपूर्वी कामाख्या मंदिरात नेत्यांची गर्दी:सुनेत्रा पवार म्हणाल्या- नवचैतन्य मिळालं, सर्वांच्या समृद्धी, उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना




आसाममध्ये भाजप सरकारच्या नव्या शपथविधी सोहळ्यापूर्वी कामाख्या देवी मंदिरात देशभरातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. नीलांचल पर्वतावर वसलेल्या प्रसिद्ध शक्तीपीठात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदिशक्ती माता कामाख्या देवीचे दर्शन घेत सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना केली. या नंतर त्यांनी सामाजिक माध्यमांवर आपला आध्यात्मिक अनुभव व्यक्त करत मंदिर दर्शनातून सकारात्मक ऊर्जा आणि नवचैतन्य मिळाल्याचे सांगितले. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची त्यांच्याशी सदिच्छा भेट झाली. तसेच महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांशीही त्यांनी आत्मीय संवाद साधला. आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. शपथविधीपूर्वी अनेक नेत्यांनी कामाख्या देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. धार्मिक श्रद्धा आणि राजकीय घडामोडी यांचा अनोखा संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला. सुनेत्रा पवार यांनी आपल्या संदेशात कामाख्या देवीच्या दर्शनाने आध्यात्मिक समाधान मिळाल्याचे नमूद केले. नीलांचल पर्वतावरील या शक्तीपीठात मातेच्या चरणी सर्वांसाठी शांतता, आरोग्य आणि आनंदाची प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याशी झालेल्या भेटीचा उल्लेख करत त्यांनी परस्पर संवादही सकारात्मक झाल्याचे म्हटले. मंदिरात महाराष्ट्रातील अनेक भाविक भेटल्याने आपुलकीचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. सुनेत्रा पवार यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. आज आसाममधील कामाख्या देवी मंदिर येथे जाऊन आदिशक्ती माता कामाख्या देवीचे पवित्र दर्शन घेतले. नीलाचल पर्वतावर वसलेल्या या शक्तीपीठात मातेच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना केली. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री मा.श्रीमती रेखा गुप्ता जी यांची सदिच्छा भेट झाली. तसेच महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांशी देखील आत्मीय संवाद साधला. माता कामाख्या देवीच्या दर्शनाने आध्यात्मिक अनुभूती, नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा लाभली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *