![]()
मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला सोलापूर जिल्ह्यातील ३२ नगरसेविकांनी भेट देत विविध स्टॉल्सची पाहणी केली. यामध्ये उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजप जिल्हा अध्यक्ष रोहिणी तडवळकर तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस सुधा अल्लीमोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, पारंपरिक खाद्यपदार्थ, ग्रामीण उत्पादनं तसेच महिला उद्योजकांनी उभारलेल्या विविध व्यवसायांची माहिती घेतली. प्रदर्शनामध्ये महिलांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आम्हाला येथे येऊन महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला भेट देण्यास सांगितले. येथे महिलांनी उभारलेले विविध उद्योग, त्यांची मेहनत आणि आत्मविश्वास पाहून प्रेरणा मिळाली. अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन सोलापूर जिल्ह्यातही अधिकाधिक महिला उद्योजकांना व्यासपीठ आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. महालक्ष्मी सरस प्रदर्शन काय आहे? महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे महाराष्ट्रातील ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारे एक भव्य वार्षिक प्रदर्शन आहे. उमेद अभियानांतर्गत (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) आयोजित या प्रदर्शनात हस्तकला, हातमाग, घरगुती मसाले आणि ग्रामीण खाद्यपदार्थांची थेट विक्री केली जाते. २०२६ वर्षाचे प्रदर्शन २ मे ते १४ मे या कालावधीत मुंबईतील बीकेसी येथे भरवण्यात आले आहे.
Source link
महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला सोलापुरातील नगरसेविकांची भेट:विविध व्यवसायांची घेतली माहिती, नाविन्यपूर्ण उपक्रमांचे केले कौतुक