![]()
मुंबईतील नालेसफाई कामांच्या पाहणीचा धडाका सुरू ठेवत आमदार अमीत साटम यांनी मंगळवारी पूर्व उपनगरांमध्ये संयुक्त पाहणी केली. झोन ६ मध्ये ५५ टक्क्यांहून अधिक नालासफाईचे काम पूर्ण झाले असले, तरी झोन ५ मध्ये केवळ २० टक्केच काम पूर्ण झाले आहे. झोन ५ मधील ना
.
आमदार साटम यांनी पूर्व उपनगरांतील मुलुंड, भांडुप, घाटकोपर, माहुल आणि चेंबूर परिसरातील नालेसफाई कामांची पाहणी केली. यावेळी मुंबई उपनगरांचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, BMC सभागृह नेते गणेश खणकर, आमदार मिहिर कोटेचा आणि आमदार पराग शाह, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा, पर्जन्य जलवाहिनी विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक नगरसेवक आणि पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
झोन ६ मधील नालेसफाईचे काम सुमारे ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. मात्र झोन ५ मधील परिस्थिती चिंताजनक असून, आतापर्यंत केवळ २० टक्के काम पूर्ण झाले आहे आणि कामाची गती अत्यंत मंद आहे. पाहणीदरम्यान BMC अधिकाऱ्यांना काम वेगाने पूर्ण करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. पुढील ८ ते १० दिवसांत झोन ५ मधील नालासफाईच्या कामांचा पुन्हा आढावा घेण्यात येईल, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी पश्चिम उपनगरांतील नालासफाईच्या कामांचीही पाहणी केली होती. पावसाळ्यात मुंबईकरांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील, असे अमित साटम म्हणालेत.
हे ही वाचा…
12 आमदारांच्या शिष्टमंडळाचा जपान दौरा रद्द:विधानसभा अध्यक्षांचा मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; अमित साटम यांच्याकडून मात्र हरताळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण-अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे जनतेला इंधनाची काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 12 आमदारांच्या शिष्टमंडळाचा जपान दौरा रद्द करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मात्र मोदींच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. कारण, त्यांच्या नालेसफाईची पाहणी करण्याच्या दौऱ्यात तब्बल 25 गाड्यांचा ताफा दिसून आला. सविस्तर वाचा…