![]()
येथील ऐतिहासिक शरण मठामध्ये उत्तराधिकारी निवडीचा पट्टाभिषेक सोहळा सोमवारी अत्यंत भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. हा वैभवशाली सोहळ्यात हजारो भाविकांच्या साक्षीने श्री चिक्कल रामलिंग शिवशरण महास्वामी यांची मठाचे नवीन उत्तराधिकारी म्हणून विधि
.
या सोहळ्यास बिदरचे श्री प. पू. शिवकुमार महास्वामी तसेच सिद्धगिरी संस्थान कणेरी मठाचे श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्या हस्ते नवीन उत्तराधिकाऱ्यांचा राज्याभिषेक व धार्मिक विधी पार पडले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, सुरेश होळकर यांच्यासह शिवानंद महास्वामी, शंकरानंद महास्वामी, प्रभानंद महास्वामी, सहजानंद महास्वामी, अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू, अलंकार चन्नबसव पट्टदेवरू व परमानंद महास्वामी उपस्थित होते.
सोमवारी पहाटेपासूनच मठ परिसरात लगबग सुरू होती. महाआरती, भजन-कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून भक्तीचा जागर करण्यात आला. दुपारच्या सुमारास अक्कलकोट शहरातील प्रमुख मार्गांवरून नूतन उत्तराधिकाऱ्यांची भव्य पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. ‘ शरणू शरणार्थी’च्या जयघोषाने शहर दुमदुमुन गेले होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी अक्कलकोट परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती.
उपस्थित महास्वामींनी आपल्या प्रवचनातून धर्म, सेवा आणि सदाचाराचा संदेश दिला. “समाजात शांतता, बंधुभाव आणि आध्यात्मिक मूल्ये टिकवण्यासाठी मठांचे योगदान मोलाचे आहे,” असे उद्गार त्यांनी काढले. मठात दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. यामुळे वातावरण आनंददायक होते.