Headlines

2 हजार 650 लिटर अवैध इंधन जप्त:पुरवठा विभाग, तहसील, पोलिस दलाने केली संयुक्त कारवाई‎




इराण- इस्रायल- अमेरीका युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनासाठी अनेक पेट्रोल पंपांवर नागरिक गर्दी करत असतानाच मंगळवारी पुरवठा विभाग, महसूल व पोलिस दलाने संयुक्त छापा टाकत एकूण २ हजार ६५० लिटर अवैध इंधन जप्त केले. इंधनाचा काळा बाजार सर्वाधिक राष्ट्रीय महामार्गावर होत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी मूर्तिजापूर रोडवर पातूर रोडवर वाशीमकडे जाणाऱ्या मार्गावर छापा टाकण्यात आला. हे इंधन २० बॅरलमध्ये साठवण्यात आले होते. याच घटनास्थळी रिकामे १५० बॅरलही आढळून आले होते. इंधन काळ्या बाजार िवकण्यासाठी महामार्गावरील वाहनांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान मंगळवारी बाळापूर -खामगाव महामार्गावर पुरवठा विभागाने धाडसत्र राबवले. छापा हॉटेल वन स्टॉपचे मागे बाळापूर खामगाव हायवे नजीक (हायवे महामार्ग पोलीस चौकी नजीक बाळापूर खामगाव महामार्गावर) टाकण्यात आला. कारवाईत अंदाजे ६०० लिटर पेट्रोल,डिझेल ४०० लिटर, इथेनॉल १६५० लिटर असा पेट्रोलियम व सदृश पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार, निरीक्षण अधिकारी विनीत ताले , योगेश सातवल स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी संयुक्तरीत्या केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *