Headlines

भोंदू मनोहरमामावर चौथा गुन्हा, 41 हजार रूपयांची फसवणूक:करमाळ्यातील घटना, चमत्कारी उपचाराचा गुन्हा‎




करमाळा तालुक्यातील घोटी येथील स्वतःला चमत्कारी उपचार करणारा म्हणून मिरवणाऱ्या भोंदू मनोहर मामा भोसले याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जुन्या प्रकरणात आजच त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती, मात्र तोच त्याच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर मामावर आतापर्यंतचा हा चौथा, तर करमाळ्यातील तिसरा गुन्हा आहे. तक्रारीनुसार, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने फिर्यादी पुन्हा मठात गेले असता मामाने त्यांना “तुमच्यावर बाहेरवसा झाला आहे” असे सांगून मंत्रोच्चार केलेली पावडर दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर राऊत यांनी पैसे परत मागितले, मात्र “मी कोणाचे पैसे परत देत नाही, जे करायचे ते करा” असे सांगून त्यांना वाटेला लावले. विशेष म्हणजे, ६ मे रोजी दोन जणांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन “पोलिसांत तक्रार देऊ नका” असे म्हणत दमदाटी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. आरोपी मनोहर मामा भोसले मठातील सेवेकरी, शिवाजी वाघमारे आणि अप्पा जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक टिळेकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. घोटी येथील दिलीप राऊत यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. राऊत यांना मुतखड्याचा त्रास असल्याने त्यांनी सुरुवातीला सोलापूर येथे उपचार घेतले होते. मात्र, मनोहर मामा औषध देऊन आजार बरा करतो, अशी माहिती मिळाल्याने ते जानेवारी २०२६ मध्ये घोटीतील मठात गेले. तिथे सुरुवातीलाच सेवेकऱ्यांनी भेटीसाठी ११ हजार रुपये उकळले. त्यानंतर मनोहर मामाने “तुमचा आजार पूर्ण बरा करतो” असे सांगून लाल रंगाची पावडर दिली. काही दिवस आराम वाटल्यावर पुन्हा त्रास सुरू झाला, तेव्हा आणखी ८० हजारांची मागणी करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *