![]()
महाराष्ट्रात कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जर कुणी जिहाद पसरवण्याचा प्रयत्न केला, तर ‘देवाभाऊंचा’ बुलडोझर चालल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मंत्री नीतेश राणे यांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी सकाळी महापालिकेने एआयएमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवल्यानंतर राणे यांनी हे विधान केले आहे. 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगरमधून आरोपी निदा खानला अटक करण्यात आली होती. पोलिस तपासानुसार, मतीन पटेल यांनी तिला आपल्या घरात आश्रय दिला होता. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने 9 मे रोजी पटेल यांना अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावत 72 तासांत उत्तर मागितले होते. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने बुधवारी सकाळी प्रशासनाने कडेकोट पोलिस बंदोबस्तात पटेल यांचे घर आणि कार्यालय जमीनदोस्त केले. इम्तियाज जलीलांची जागा जेलमध्ये नाशिक जिहाद प्रकरणावर बोलताना राणे यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर तोफ डागली. नाशिक प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड जलील आहे. जे लोक ‘महाराष्ट्र को हरा कर देंगे’ अशा वल्गना करतात, त्यांची जागा बाहेर नाही तर जेलमध्ये आहे. लवकरच या प्रकरणाचा नारळ फुटेल, असा दावाही त्यांनी केला. ठाकरे अन् अर्थतज्ज्ञ यांचा संबंध काय? राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, ठाकरे आणि अर्थतज्ज्ञ यांचा नेमका संबंध काय? अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेची खिल्ली उडवली. पंतप्रधान मोदींचे आवाहन देशासाठी नीतेश राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही भाजपचे नेते म्हणून आवाहन केले नाही. त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून आाहन केले आहे. त्यामध्ये पक्षीय राजकारण कुणी आणू नये. देशासमोर उद्या जे संकटे येऊ शकतात त्या संदर्भात हे आवाहन केले होते. त्यावर जर तुम्ही राजकारण करणार असाल तर तुमच्या भारतीय असण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. मतीन हा माझा विश्वासू माणूस- जलील मतीन पटेल यांच्याविषयी बोलताना इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट केले. मतीन हा माझा विश्वासू माणूस आहे. कायदा सर्वांसाठी समान असेल तर त्याची अंमलबजावणीही समान पद्धतीने झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
Source link
महाराष्ट्रात जिहाद कराल तर 'देवाभाऊंचा' बुलडोझर चालणारच:इम्तियाज जलील यांची जागा जेलमध्येच- नीतेश राणे