![]()
लग्नानंतर अवघ्या 20 व्या दिवशी मोहाडी (ता. जामनेर) येथील एका नवविवाहितेचा मृत्यू झाला. तिला उष्माघात सदृश्य आजाराची लक्षणे दिसून आली आहे. दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या वैशालीने, बोलतांना अडखडणाऱ्या सुनीलच्या आयुष्यात सुखाचे रंग भरले होते. मात्र, लग्नाची हळद पूर्ण निघण्यापूर्वी दांपत्याची ताटातूट केली. बाळद (ता. पाचोरा) येथील वैशाली भिल (वय 20) हिचा विवाह 23 एप्रिल रोजी जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील सुनील भिल याच्याशी झाला होता. वैशाली दोन्ही पायांनी दिव्यांग होती, एकमेकांचा आधार बनू या जिद्दीने हे कुटुंब उभे राहत होते. बुधवारी सकाळपासून वैशालीला उलट्या आणि चक्करचा त्रास सुरू झाला. सायंकाळी 4 वाजता तिला नेरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी जळगावला हलवण्यास सांगितले. मात्र रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. बहादरपूर येथील बद्रीनाथ मंदिराच्या पुजाऱ्याचा भोवळ येऊन पडल्याने मृत्यू अमळनेर | बहादरपूर येथील बद्रीनाथ मंदिराचे पुजारी श्रीहरी प्रभाकर दीक्षित (वय 69) यांचा सोमवारी बस स्थानकात भोवळ येऊन पडल्याने मृत्यू झाला. उष्माघात सदृश आजाराने त्यांच्या मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान मृताचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून त्याची तपासणी नाशिक येथे होईल. त्यांच्या अहवालानुसार मृत्यूचे नेमके कारण समजेल अशी माहिती ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष पाटील यांनी दिली. श्रीहरी दीक्षित हे बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अमळनेर बस स्थानक परिसरात आले होते. त्यावेळी लघुशंकेसाठी गेले असता अचानक त्यांना चक्कर आली व ते खाली कोसळले. ही घटना पाहताच बस स्थानकावर हजर असलेल्या मुलाने तत्काळ वाहतूक पोलिस हवालदार संजय बोरसे, रवींद्र बोरसे व विनय पाटील यांना माहिती दिली. पोलिस हवालदार संजय बोरसे यांनी तातडीने रूग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांनी प्रसंगावधान दाखवत जवळील रिक्षाचालकाची मदत घेत दीक्षित यांना स्वतःच तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष पाटील यांनी तपासणीअंती दीक्षित यांना मृत घोषित केले. व्हिसेरा तपासणीसाठी रवाना व्हिसेरा तपासणीसाठी नाशिकला पाठवला मृताचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून त्याची तपासणी नाशिक येथे होईल. त्यांच्या अहवालानुसार मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे. डॉ.आशिष पाटील, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय,अमळनेर उन्हात मोटारसायकलने केला होता प्रवास नेरी येथे या महिलेला दवाखान्यात आणले तेव्हा तिला प्रचंड ताप व अंगावर सूज होती. अत्यावश्यक औषधोपचार केल्यानंतर आयसीयूत उपचार होणे गरजेचे होते म्हणून पुढील उपचारासाठी जळगावला जाण्याचा सल्ला दिला. मंगळवारी या महिलेने मोटरसायकलवर लांबचा प्रवास केला. त्या दिवशी तापमान 46 अंशापर्यंत असल्याने तिला उष्माघात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. कोमल देसले, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी. चार महिन्यापुर्वी वैशालीच्या वडिलांचा झाला होता मृत्यू वैशाली भिलच्या कुटुंबावर गेल्या चार महिन्यांत कोसळलेला हा दुसरा मोठा आघात आहे. चार महिन्यांपूर्वीच तिच्या वडिलांचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला होता. घरातील मोठी मुलगी म्हणून वैशाली सर्वांची लाडकी होती. वडिलांच्या निधनानंतर तिचे लग्न लावून दिले, पण नियतीला तिचे सुख पाहवले नाही. वैशालीसह चार बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. 25 दिवसात घडल्या घटना गेल्या 25 दिवसात जळगाव शहरात एका प्रौढाचा एसटी वर्कशॉपजवळ मृत्यू झाला. पाचोरा येथे दिवसभर उन्हात एका फळ विक्रेत्याचा तर भुसावळला लग्नासाठी गेलेल्या नांदेडच्या महिलेचा उष्माघात सदृश्य आजाराने मृत्यू झाला. तर बुधवारी वैशाली भिल या नवविवाहितेचा मृत्यू झाला. 11 मे रोजी हे भिल दांपत्य चोपडा तालुक्यातील खामखेडा येथे लग्नासाठी गेले होते. 12 मे रोजी सायंकाळी ते मोहाडीला परतले. तेव्हापासून तिला त्रास सुरु झाला होता.
Source link
जळगावात लग्नानंतर 20 व्या दिवशी विवाहितेचा उन्हात फिरल्याने मृत्यू:उष्माघातसदृश आजाराची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवली शक्यता