Headlines

Amit Thackeray Slams Mahayuti Govt Over NEET Exam Opposition


तामिळनाडू सरकारने विधानसभेत ‘नीट’ परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणांवर वैद्यकीय प्रवेश देण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राजकारण शेवटी विद्यार्थ्यांच्या आणि सामान्

.

अमित ठाकरे म्हणाले, जो निर्णय आज तामिळनाडूने घेतला, तो महाराष्ट्र सरकारने काही वर्षांपूर्वीच घ्यायला हवा होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2016 मध्येच ठणकावून सांगितले होते की, नी’ ही परीक्षा निरुपयोगी असून ती महाराष्ट्रातील ग्रामीण व मराठी विद्यार्थ्यांचा बळी घेण्यासाठी आणली आहे. परंतु, महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना तेव्हाही कोणाचे ऐकायचे नव्हते आणि आजही ऐकायचे नाही.

तामिळनाडूत विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वपक्षीय एकजूट

अमित ठाकरे म्हणाले की, तिथे सरकारने नीट रद्द करण्याचा ठराव मांडल्यानंतर विरोधकांनी उगाच विरोधाला विरोध केला नाही. डावे असोत की इतर विरोधी पक्ष, सर्वांनी राजकीय मतभेद आणि ईगो बाजूला ठेवून या निर्णयाला पाठिंबा दिला. भाजपचा एक आमदार वगळता सर्वांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एकत्र येण्याचे उत्तम उदाहरण दाखवले. हा ठराव कायदेशीररीत्या टिकेल की नाही हा वेगळा भाग, पण राज्य आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी दाखवलेली ही एकजूट अत्यंत महत्त्वाची आहे.

आम्ही विरोधासाठी विरोध करणारे नाही

अमित ठाकरे म्हणाले, आम्हाला निव्वळ राजकारण करायचे नाही. उद्या सरकारने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या किंवा मराठी माणसाच्या हिताचा खरोखर चांगला निर्णय घेतला, तर आम्ही सर्वात आधी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि हे आम्ही आधीही केले आहे. पण त्यासाठी सरकारने अहंकार आणि विरोधकांना डावलण्याची वृत्ती सोडली पाहिजे.महाराष्ट्रात समाजकारण उरलेच नाही, फक्त सत्ताकारणाचा आणि दडपशाहीचा खेळ सुरू आहे!’ असे जनतेला वाटू देऊ नका. आता तरी सत्ताधाऱ्यांनी एकत्र येण्याची हिंमत दाखवावी, कारण महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! अशी पोस्ट करत अमित ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वृत्त वाचा अमित शहांच्या दबावाखाली 5 हजार कोटींना शिवसेना विकली:शहांना उपपंतप्रधान व्हायचे आहे पण मोदींनी नकार दिला- संजय राऊत

केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली येऊन शिवसेना पक्ष आणि चिन्ह 5 हजार कोटी रुपयांना एकनाथ शिंदे यांना विकल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आमदार फोडणे, त्यांचा गुजरात ते गोवा प्रवास, आणि निवडणूक आयोग मॅनेज करणे यासाठी जनतेचा तब्बल 5 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून यामध्ये निवडणूक आयोगाने दलालाची भूमिका पार पाडल्याचा घणाघात राऊत यांनी केला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.