Headlines

Asana Bridge Murder Case Solved; Local Crime Branch Arrests Two Accused


आसना नदीवरील पुलाजवळ झालेल्या खून प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १५ दिवसांत दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी प्राथमिक चौकशीत खून प्रकरणातील सहभागाची कबुली दिली असून त्यांना पुढील कारवाईसाठी विमानतळ पोलिस ठाण्या

.

पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

११ जुलै २०२६ रोजी आसना नदीवरील पुलाखाली सचिन काळे यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा शोध सुरू केला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, फरार आरोपी अनिल शंकर वाघमारे (वय २४, रा. माळजानगर, माळटेकडी, नांदेड) आणि प्रज्ज्वल ऊर्फ बारक्या उत्तम गोवंदे (वय २०, रा. त्रिरत्ननगर, सांगवी बुद्रुक, नांदेड) हे शंकरराव चव्हाण चौकाजवळील पुलाखाली येणार आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी खून प्रकरणातील सहभागाची कबुली दिली. त्यानंतर दोघांनाही पुढील तपासासाठी विमानतळ पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

हे ही वाचा…

धावत्या लोकलमधून प्रवाशाला लाथ मारून खाली पाडले?:मुंबईत टीसीवर गंभीर आरोप, रेल्वे प्रशासनाच्या तपासणीत वेगळीच माहिती समोर

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मारामारी आणि वादाच्या घटना समोर येत असतानाच आता एका अजब आणि धक्कादायक प्रकरणामुळे मध्य रेल्वे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका तिकीट तपासनिसाने (TC) दंड भरण्यासाठी पैसे नसलेल्या विनातिकीट प्रवाशाला थेट धावत्या लोकलमधून लाथ मारून रुळांवर ढकलल्याचा खळबळजनक आरोप एका सहप्रवाशाने केला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने आरपीएफच्या ‘सीसीटीव्ही फुटेज’चा दाखला देत हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. सविस्तर वाचा…

अकोल्यात शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाचा मृत्यू:पक्षांतर्गत वादातून माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात घडवल्याचा नातेवाईकांचा आरोप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन शेख समद यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला केवळ एक अपघात वाटणाऱ्या या घटनेला आता धक्कादायक वळण मिळाले असून, हा साधा अपघात नसून पक्षाच्याच माजी जिल्हाप्रमुखाने रचलेला हत्येचा हा एक सुनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप मृत नेत्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. सविस्तर वाचा…

बाळापूर लैंगिक अत्याचार प्रकरण:उपचारादरम्यान पीडित अल्पवयीन मुलीचा मृत्यू, आरोपी महिनाभरापासून फरार

बाळापूर शहरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाला आता अत्यंत दुःखद वळण लागले आहे. अत्याचाराच्या मानसिक धक्क्यातून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पीडित मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बाळापूरमध्ये हळहळ आणि संतापाची लाट उसळली आहे. संतापजनक बाब म्हणजे, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पोलिस कर्मचारी पवन वडगावे हा गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटला तरी अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.