आयुक्तांचे सुखना नदीतील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश:५ जून रोजी नदीकाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचेही निर्देश
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी मंगळवारी सुखना नदी पुनर्जीवन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नदी पात्रातील अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे आणि ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी नदी पात्रातील सर्व अतिक्रमणे तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश दिले. नदीपात्रात येणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी…