![]()
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी मंगळवारी सुखना नदी पुनर्जीवन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नदी पात्रातील अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे आणि ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी नदी पात्रातील सर्व अतिक्रमणे तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश दिले. नदीपात्रात येणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे सांडपाणी औद्योगिक क्षेत्रातून येत असल्यास, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी समन्वय साधून त्यावर तात्काळ प्रतिबंध घालण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ज्या ठिकाणी नागरिक ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात सोडत आहेत, त्याबाबतही तातडीने कार्यवाही करून नदीचे प्रदूषण थांबवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. या स्थळ पाहणीच्या वेळी शहर अभियंता संजय कोंबडे, मुख्य उद्यान अधिकारी तथा सुखना नदी पुनर्जीवन प्रकल्प प्रमुख विजय पाटील, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, उपायुक्त अतिक्रमण निष्कासन विभाग सविता सोनवणे आणि सुखना नदी पुनर्जीवन प्रकल्प विशेष कार्य अधिकारी जयवंत कुलकर्णी उपस्थित होते.
Source link
आयुक्तांचे सुखना नदीतील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश:५ जून रोजी नदीकाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचेही निर्देश