डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट:मनीषा माने-मुसळेचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला;आता उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार
सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणातील आरोपी मनीषा माने-मुसळे हिला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने तिचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला आहे. जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी सुनावणीदरम्यान हा महत्त्वाचा निर्णय दिला. या निकालामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या प्रकरणात नवे वळण आले…