Headlines

Admin

समय रैनाच्या आजोबांना मिळाली होती मारण्याची धमकी:दहशतवाद्यांच्या हिट लिस्टमध्ये होते, स्थानिक काश्मिरी मुस्लिमांनी जीव वाचवला होता

कॉमेडियन समय रैना यांनी नुकतेच सांगितले की, 1990 च्या दशकात काश्मीरमधील दहशतवादाच्या काळात त्यांच्या आजोबांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. तथापि, स्थानिक काश्मिरी मुस्लिमांच्या मदतीमुळे त्यांचे प्राण वाचले होते. समयने ‘दॉस्टकास्ट’ यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत काश्मीरमधील दहशतवाद आणि काश्मिरी पंडितांच्या स्थलांतराच्या परिणामांवर सविस्तरपणे चर्चा केली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबालाही रातोरात काश्मीर सोडावे लागले होते….

Read More

कोणतं ऑपरेशन कधी करायचं हे मला ठाऊक:जयकुमार गोरेंचा सोलापुरात शिवसेनेला टोला, म्हणाले- शरद पवार गटाने वारकरी संप्रदायाला बदनाम करू नये

कोणतेही ऑपरेशन हे त्याच्या आवश्यकतेनुसारच करायचे असते. मला पक्के ठाऊक आहे की कोणते ऑपरेशन केव्हा करायचे. त्यामुळे कोणीही चिंता करण्याचे कारण नाही, योग्य वेळी योग्य ‘सर्जरी’ होईल आणि त्याचे परिणामही सर्वांना दिसतील, अशा शब्दांत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरला मिश्किल टोला लगावला. तसेच, वारकरी संप्रदायावरून सुरू असलेल्या वादात उडी घेत, राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

तुम्ही विरोध करा, मग आम्ही विरोध केल्यास सहन करा:भ्रष्टाचाराबद्दल जाब विचारल्याने एकावर जीवघेणा हल्ला; भाजप कार्यकर्त्यांवर संशयाची सुई

पिंपरी-चिंचवड शहरात भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे एका तक्रारदाराच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगवी ते बोपोडी दरम्यान उभारण्यात आलेल्या पुलाच्या खर्चावरून प्रश्न विचारणाऱ्या दिलीप मारुतीराव तनपुरे यांच्यावर लोखंडी रॉड आणि चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, हा हल्ला भाजप नेत्याच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सांगवी…

Read More

मोदी म्हणाले- TMC ने बंगालमधील बहिणींची फसवणूक केली:ममतांना बहिणी-मुली मोठ्या संख्येने खासदार व्हाव्यात असे वाटत नाही

पंतप्रधान मोदींनी बंगालमधील बिष्णुपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित केले. ते म्हणाले की, बंगालमधील ममता सरकार येथील मुलींची फसवणूक करत आहे. येथील मुली मोठ्या संख्येने खासदार होऊ नयेत अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून त्यांनी संसदेत आरक्षणाशी संबंधित कायदा मंजूर होऊ दिला नाही. यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी कोईम्बतूर येथील जनसभेत सांगितले की, DMK चे काळे…

Read More

तू घुसखोर आहेस, तुला इथून उचलून घेऊन जाईन:म्हाडाच्या कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्या रहिवाशालाच अधिकाऱ्यांची दमदाटी

गोरेगाव पश्चिम येथील ऐतिहासिक मोतीलाल नगर १, २ आणि ३ च्या पुनर्विकासाचा म्हाडाचा मास्टर प्लॅन सादर होत असताना, म्हाडा अधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शांततेच्या मार्गाने प्रश्न विचारणाऱ्या एका स्थानिक रहिवाशाला म्हाडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी भरसभेत “तू घुसखोर आहेस, तुला इथून उचलून घेऊन जाईन” अशी धमकी दिल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे….

Read More

दुसऱ्यांदा पालक बनणार दीपिका-रणवीर:जोडप्याने मुलगी दुआचा क्यूट फोटो शेअर करून गरोदरपणाची दिली माहिती

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने रविवारी तिच्या दुसऱ्या गर्भधारणेची घोषणा केली. दीपिका आणि रणवीरच्या इंस्टाग्राम हँडलवर त्यांची मुलगी दुआचा एक फोटो शेअर करण्यात आला, ज्यात मुलीने एक प्रेग्नेंसी टेस्ट किट पकडले आहे, जे पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवत आहे. फोटोमध्ये रणवीरने मुलीला कडेवर घेतले आहे, मात्र त्याचा चेहरा दिसत नाहीये. फोटोमध्ये दुआचा अर्धा चेहरा दिसत आहे. दीपिका आणि…

Read More

अक्षय्य तृतीयेला होणारे बालविवाह रोखा:महिला व कल्याण मंत्र्यांचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश; बालविवाह रोखण्यास कडक उपाययोजना

अक्षय्य तृतीयेच्या या शुभमुहूर्तावर राज्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळ्यांचे आयोजन होत असल्याने बालविवाह रोखण्यासाठी राज्य प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. आज झालेल्या राज्यस्तरीय दूरदर्शन प्रणालीद्वारे व्हिडीओ कॉन्फरासिंगद्वारे महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांना…

Read More

पावसाळ्यापूर्वी फिडर सेपरेशन पूर्ण करा; वीजपुरवठा होणार सक्षम

अकोला महावितकरण कंपनीच्या अकोला परिमंडळात सुरू असलेल्या फिडर सेपरेशनच्या कामामुळे वीज पुरवठ्याच्या गुणवत्तेत सुधारणा होवून वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार असून या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्य अभियंता . राजेश नाईक यांनी दिले आहेत. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.विद्युत…

Read More

मणिपूरमध्ये उग्रवाद्यांनी केली दोन लोकांची हत्या:चालत्या गाडीवर गोळीबार; एनआयएला तपास सोपवला; शोधमोहीम सुरू

मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात शनिवारी दुपारी सुमारे 2:30 वाजता एका निवृत्त लष्करी जवानासह दोन लोकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एसडब्ल्यू चिनाओशांग (46 वर्षे) आणि यरुइंगम वाशुम (42 वर्षे) इंफाळहून उखरुलला जात असताना, अचानक दहशतवाद्यांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार सुरू केला. या घटनेच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी उखरुलला भेट दिली होती आणि कुकी…

Read More

भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याला 'लिव्ह इन' महागात:पैसे द्या नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन म्हणणाऱ्या महिलेवर हिंगोलीत गुन्हा दाखल

हिंगोलीच्या भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्याशी जवळीस साधून अत्याचाऱ्या खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत पैशाची मागणी करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील एका महिलेवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील बळसोंड भागातील भाजपाचे माजी पदाधिकारी आशिष वाजपेयी हे युवा विकास सोसायटी अंतर्गत शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेमध्ये काम करतात. बेरोजगार…

Read More