ग्रामपंचायतच गावच्या विकासाचे मुख्य साधन- भास्कर पेरे पाटील:जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम
गावातील व्यक्तींचा विकास करण्याचे मुख्य साधन ग्रामपंचायत आहे, असे प्रतिपादन पाटोदा येथील आदर्श माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. . येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त उत्सव समितीने रविवारी (दि. १२) आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. पेरे पाटील म्हणाले, गावाची ओळख, संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य जपण्याची जबाबदारी…