Headlines

नाशिक कॉर्पोरेट जिहाद:आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चेनानीला 2 दिवस पोलिस कोठडी, एचआर हेडने उलट तक्रारदार तरुणीलाच दरडावले होते



टीसीएस या बहुराष्ट्रीय कंपनीतील जिहाद आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक झालेली एचआर हेड अश्विनी चेनानी हिचे तौसिफ अत्तारसोबत ३८, दानिश शेखला १ कॉल, रझा मेमनला २२ कॉल व एक आक्षेपार्ह चॅटिंग उघड झाले आहे.

.

पीडित तरुणीने संशयितांविरोधात केलेल्या तक्रारीकडे अश्विनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तिने पीडितांना ‘तुमको क्यू हायलाइट होना है? छोड दो, जाने दो’ असे दरडावून आरोपींना उघडपणे चिथावणी दिली. तिची तीन दिवसांची कोठडी सोमवारी संपल्याने तिला कोर्टात हजर केले. आर्थिक व्यवहारांच्या तपासात ती पोलिसांना अजिबात सहकार्य करत नाही. त्यामुळे तिच्या ५ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने तिला १५ एप्रिलपर्यंत दोन दिवसांची कोठडी सुनावली.

टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनीही अधिकाऱ्यामार्फत केली चौकशी सुरू

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सोमवारी नाशिक येथील टीसीएस कंपनीतील लैंगिक छळाचा प्रकार “अत्यंत चिंताजनक आणि क्लेशदायक” असल्याचे म्हटले. या प्रकरणाची एका वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी असेही जाहीर केले की, वस्तुस्थिती तपासून आणि या परिस्थितीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी टीसीएसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आरती सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली सखोल चौकशी सुरू आहे. तपासात दोषी आढळलेल्यांवर योग्य आणि कठोर कारवाई केली जाईल. प्रक्रियेत सुधारणा लागू करून त्यांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

लैंगिक छळ रोखण्याची जबाबदारी, तरीही तक्रारीकडे दुर्लक्ष

टीसीएस कंपनीत चेनानी असिस्टंट जनरल मॅनेजर (डिलिव्हरी पार्टनर) पदावर आहे. ती ‘पॉश’ (POSH) समितीची सदस्य आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची दखल घेणे व छळ रोखून संबंधितांवर कारवाई करण्याची जबाबदारी या समितीची असते. चेनानीने पीडित महिलांच्या तक्रारींची दखल न घेता तिने संशयित आरोपींच्या कृत्याला चिथावणी दिल्याचे निष्पन्न झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *